मुंबई

...म्हणून मुंबईतील कोरोना व्यतिरिक्त रुग्ण खासगी रुग्णालयांच्या दारात 

संजय घारपुरे

मुंबई ः कोरोना व्यतिरीक्त अन्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयांना डॉक्‍टरांची वानवा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. 
हे वाचा : दुसर्या दिवशीही चाकरमन्यांची रेल्वेकडे पाठ

अनेक रुग्णांनी उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालये अन्य रुग्णांसाठी खुली होण्याची प्रतीक्षा केली. पण, आता तेथील रुग्णालयात गेल्यावर त्यांना नकार मिळत आहे. 
आमच्याकडे पुरेसे भूलतज्ज्ञ नसल्याचे सांगण्यात आले. अधिक त्रास असलेल्या रूग्णांना दाखल करुन घेण्यात येते. मात्र, त्यांना शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही रुग्णांनी आपली परिस्थिती जास्त गंभीर झाली असल्याचे सांगितले. 

आनंदवार्ता : पालघरची पाण्याची चिंता मिटली

मार्चपासून शक्‍यतो शस्त्रक्रिया लांबवणे भाग पडत आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयाचे कोरोना उपचार केंद्रात रुपांतर करण्यात आले. त्यामुळे तिथे केवळ तातडीच्याच शस्त्रक्रियाच होत आहेत. पण त्यानंतरही भूलतज्ज्ञांची वानवा अनेक शस्त्रक्रियेच्यावेळी जाणवत असल्याचे डॉक्‍टर सांगतात. नायर तसेच शीव रुग्णालयात अतीदक्षता विभागाचे कोरोना उपचार केंद्रात रुपांतर करण्यात आले आहे. कुपर रुग्णालयात डायलिसीसचे बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात ओपीडी रुग्ण जवळपास आठ हजारांनी कमी झाले आहेत. 
सार्वजनिक रुग्णालयात प्रतीक्षा यादी वाढत असल्याने अनेकांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे, पण तेथील खर्च अनेकांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी कर्ज काढणे भाग पडत आहे. 

- संपादन : नीलेश पाटील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT